- *सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मागणीला दाखवली केराची टोपली,
- एरंडोल येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची २१ फेब्रुवारी रोजी तातडीची बैठक……….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे शहरातील पुतळ्यांचे सुशोभीकरणाकरीता शासनाकडून ४० ते ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.सदर निधी विनियोग करतांना शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक, विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन सर्व समावेशक समिती गठीत करावी.अशी मागणी ४ महिन्यांपूर्वी निवेदन देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेकडे करण्यात आली होती.मात्र या मागणीला अधिकाऱ्यांनी मनमानी करत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांची बैठक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता एरंडोल वि.का.सोसायटी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस संबंधित मान्यवरांनी उपस्थिती द्यावी.असे आवाहन निमंत्रकांकडून करण्यात आले आहे.
