हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sun, 22 Sep 202402:56 PM IST
Maharashtra News Live: Mumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
- Boat Capsizes During Andheri Cha Raja Immersion: वर्सोवा येथे अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान बोट उलटल्याने अनेकजण पाण्यात बुडाले.
Sun, 22 Sep 202410:42 AM IST
Maharashtra News Live: रामदास आठवले विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, भाजपकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा, प्रकाश आंबेडकरांना म्हणाले…
- Maharashtra assembly election 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदार आठवले यानी रणशिंग फुकले आहे.
Sun, 22 Sep 202409:59 AM IST
Maharashtra News Live: Mumbai Boy Rape: आता मुलेही सुरक्षित नाहीत! पालकांना जीवे मारण्याची धमकी देत ८ महिने अत्याचार
- Mumbai Minor Boy Rape: मुंबईत १३ वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. ही घटना मुंबईतील मुलुंड परिसरातील सार्वजनिक शौचालयात घडली.
Sun, 22 Sep 202408:59 AM IST
Maharashtra News Live: वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू
- Pune Vadgaon Sheri : वडगावशेरी येथे आज सकाळी १० च्या सुमारास पैगंबर जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने एका तरुणाचा भाजून मृत्यू झाला.
Sun, 22 Sep 202408:18 AM IST
Maharashtra News Live: ‘पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवा; मला शिव्या खाव्या लागतात’; नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर
- Nitin Gadkari on Pune Mumbai express way : नितीन गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे मुंबई पुणे आणि पुणे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून हे खड्डे पुढील तीन महिन्यात बुजवा असे नितीन गडकरी यांनी सरकारला म्हंटलं आहे.
Sun, 22 Sep 202407:34 AM IST
Maharashtra News Live: लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोनं अन् चांदीचा लिलाव; तब्बल ‘इतक्या’ कोटींची भाविकांनी लावली बोली
- Lalbaugcha Raja’s Gold and Silver Auction : लालबागचा राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीचा लिलाव करण्यात आला असून यातून मोठी रक्कम देवस्थानाला मिळाली आहे. ही रक्कम लोकहिताच्या उपक्रमांसाठी वापरली जाणार आहे.
Sun, 22 Sep 202406:40 AM IST
Maharashtra News Live: चाकण प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमपीसीबीची मर्सिडीज-बेंझला नोटीस
-
MPCB serves notice to Mercedes-Benz : एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी चाकण येथील मर्सिडीज बेंझ प्रकल्पाला भेट दिल्यानंतर महिनाभरानंतर शुक्रवारी पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.
Sun, 22 Sep 202405:36 AM IST
Maharashtra News Live: Beed Accident : कंटेनरनं कारला उडवलं! बीडमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू
- Beed Ambajogai Swift and Container Accident: बीडमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. ही घटना अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ घडली. स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात चौघे ठार झाले आहेत.
Sun, 22 Sep 202404:12 AM IST
Maharashtra News Live: pune potholes : पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी केली नाराजी व्यक्त! पुणे पोलिसांना पत्र लिहीत म्हटलं….
- pune potholes : पुण्यातील खड्ड्यांची दखल थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली आहे. त्यांनी थेट पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुण्यात पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी रस्ते दुरुस्ती करावी असे पत्र पोलिसांनी पालिकेला दिले आहे.
Sun, 22 Sep 202402:37 AM IST
Maharashtra News Live: Parbhani Latur Rain : परभणी, लातूरला पावसाने झोडपले! काही तास झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय
- Parbhani Latur Rain : परभणी, लातूरला सलग दोन दिवस पावसाने झोडपले. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे काही तासांत रस्ते जलमय झाले आहे. पुढील काही दिवस मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Sun, 22 Sep 202401:58 AM IST
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट
- : राज्यात हा आठवडा पावसाचा राहणार आहे. मॉन्सून परतीचे वेध लागले असतांना राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान देण्यात आला आहे.
Sun, 22 Sep 202401:30 AM IST
Maharashtra News Live: कसे असेल 22 September 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे..