-
अतिक्रमण विरोधात विजय महाजन यांचे बेमुदत उपोषणाचे शस्त्र….
-
एरंडोल येथील अतिक्रमण काढून घेण्यास तात्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर विजय रमेश महाजन या तरुणाने उपोषणाचे शस्त्र उपसले आहे.
एरंडोल येथील गट न 1020/3 प्लॉट 1च्या घरा लगत असलेल्या जुन्या राज्य महामार्गा क्रमांक 185 लागुन काही अतिक्रमण धारकांनी व्यवसायाच्या उद्देशाने अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमामुळे विजय रमेश महाजन यांचा वापराचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे यामुळे विजय महाजन या तरुणाने गेली दहा वर्ष जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी करत असून सदर कर्मचारी हे केवळ कागदी घोडे नाचवीत असून त्याला उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती तरी दिनांक 15/10/2025 पासून या तरुणाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे परंतु जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंता यांनी सदर अधिक्रमण संदर्भात वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठविला असून आव्हाल प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमण काढून घेण्यास कारवाई करण्यात येईल असे तोंडी उत्तर देण्यात आले असता सदर उपोषण करते यांनी योग्य ती कार्यवाही तात्काळ करून मला न्याय द्यावा असे सांगण्यात आले तरी जोपर्यंत प्रत्यक्षात कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा विजय महाजन यांनी घेतल्याचे दिसून आले…..