उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि २४) रायगड, परभणी, हिंगोली, नांदेड तर २५ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, पुणे व २६ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात दक्षिण महाराष्ट्रातील व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच औरंगाबाद, जालना, यवतमाळ, गडचिरोली वगळतात उर्वरित जिल्ह्यात व मराठवाड्यात, संपूर्ण विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ सप्टेंबर रोजी रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली येथे मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.