-
आडगाव येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान
-
आडगाव प्रतिनिधी –.तालुका एरंडोल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध व्याख्याते” प्रा. वसंत हंकारे” यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे., गुरु शिष्य जयंती महोत्सव 2026 च्या निमित्ताने दिनांक 9 एप्रिल 2026 गुरुवार रोजी रात्री 8:00वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा ,आडगाव तालुका एरंडोल येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला असून सदर कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत .क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक प्रबोधन घडून आणण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन महात्मा फुले प्रतिष्ठान आडगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे .”न समजलेले आई-बाप” हा महत्त्वाचा विषय त्यांच्या व्याख्यानाचा असून यासोबत समाज प्रबोधन हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलाब साबळे ,उपाध्यक्ष सुभाष देवरे ,सचिव दत्तात्रय महाजन यांचे सह सर्व संचालकांनी केले आहे. आपल्या भावी पिढीला आई-वडिलांच्या कर्तुत्वाची जाणीव करून देण्यासाठी आपल्या पाल्यांसह सर्व कुटुंबीयांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महात्मा फुले प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी असे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
