*एरंडोल मतदार संघाच्या विकासासाठी ६ ते ७ हजार कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करणार तरच बापसे बेटा सवाई नाही तर आमदारकीला काही अर्थ नाही……!**आमदार अमोल चिमणराव पाटील यांचे एरंडोल येथे बसस्थानक व आगाराच्या नुतनीकरणाच्या भुमी पुजन प्रसंगी प्रतिपादन…….!*

एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल विधानसभा मतदारसंघात ६ ते ७ हजार कोटींची विकासकामे करण्याचा संकल्प आपण पुर्ण करणार.तरच ” बापसे बेटा सवाई नाही तर आमदारकीला काही अर्थ नाही.” असा दृढ विश्वास आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी येथे व्यक्त केला.
एरंडोल बसस्थानक,बस आगाराचे नुतनीकरण व वाहनतळाचे काॅंक्रीटीकरण या विकासकामांचे भुमिपूजन आमदार अमोल चिमणराव यांच्या हस्ते २१ जुलै २०२५ रोजी करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.
प्रास्ताविक आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन घनश्याम पाटील यांनी केले तर कमलेश पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.व्यासपीठावर आमदार अमोल पाटील,ज्ञानेश्वर आमले, वासुदेव पाटील, प्रभाकर पाटील,रवि जाधव,सुदाम राक्षे,गबाजी पाटील, शालिग्राम गायकवाड, किरण पाटील यांची उपस्थिती होती.तसेच बाळा पाटील,नरेश ठाकरे,पन्ना सोनवणे,चिंतामण पाटील, देविदास चौधरी,संजय पाटील आदी कार्यकर्ते, नागरिक, प्रवासी उपस्थित होते.
बसस्थानक व बस आगार यांच्या नुतनीकरणाच्या भुमीपूजन प्रसंगी राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव येथील अधिकारी व एरंडोल बस आगारातील कर्मचारी यांची उपस्थिती नसल्याबद्दल आमदार अमोल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांना खडे बोल सुनावले.
न.पा.निवडणूकांच्या आधी जि.प.व पंचायत समिती निवडणुका लवकरच होण्याचे संकेत आमदार अमोल पाटील यांनी यावेळी दिले.