-
आषाढी एकादशी निमित्त
फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम उत्साहात साजराएरंडोल प्रतिनिधी – येथे आषाढी एकादशी निमित्त फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूल एरंडोल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, या दिवशी विष्णू योगनिद्रेत जातात, अशी श्रद्धा आहे.
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून ‘ज्ञानोबा-माउली-तुकाराम’ च्या गजरात दिंडी काढली. या दिंडीमुळे परिसर भक्तिमय झाला होता. दिनांक 5 जुलै 2025 वार शनिवार रोजी सकाळी 9 ते 12 च्या वेळेत संपन्न झाला
विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक आणि गाण्यांच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे महत्त्व, भक्तीभाव आणि संतांची शिकवण सादर केली.
विद्यार्थ्यांनी भजनांद्वारे भगवान विष्णूची स्तुती केली आणि कीर्तनातून भक्तीचा आनंद घेतला.
आषाढी एकादशीचे महत्त्व स्पष्ट करताना उपवासाचे आणि त्यातील पदार्थांचे महत्त्व सांगितले
या निमित्ताने मुलांना आपल्या परंपरेचे, सामाजिक समतेचे आणि संतांच्या महानतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
आध्यात्मिक प्रगती आणि आत्मचिंतनासाठी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
शैक्षणिक वातावरणात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हा या कार्यक्रमाचा एक उद्देश आहे.या निमित्ताने विद्यार्थ्यांनी परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व अनुभवले.
या प्रसंगी मुख्याध्यापक नूतन पाटील मॅडम, अश्विनी वाल्डे. , गायत्री सुतार , प्रिया पाटील , धनश्री पाटील शिक्षकेतर कर्मचारी रूपाली पाटील लुभान पाटील उपस्थित होते
शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.