Home » सामाजिक » *आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी केला पत्रकारांचा सन्मान…..!*

*आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी केला पत्रकारांचा सन्मान…..!*

  1. *आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी केला पत्रकारांचा सन्मान…..!
  2. *एरंडोल – येथे २९ जानेवारी २०२५ रोजी आस्था महिला मंडळातर्फे शहरातील पत्रकारांचा बुके व पेन देऊन गौरव करण्यात आला.विशेष हे की सदर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही.निस्पृह भावनेने महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.तसेच भाषणबाजी व आभारप्रदर्शनाच्या औपचारिकतेला फाटा देण्यात आला.याप्रसंगी आमदार अमोल पाटील यांच्या धर्मपत्नी मृणालिनीताई पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.मोहन शुक्ला हे होते.
    यावेळी नंदा शुक्ला यांनी पत्रकारांच्या कार्याबाबत एक कविता सादर केली.शोभा साळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक शितल चौधरी यांनी केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती ठाकूर, उपाध्यक्षा नंदा शुक्ला,शोभा साळी, शकुंतला अहिरराव, चंद्रकला जैन,शितल चौधरी,भारती साळुंखे,मिनाक्षी पाटील, निलिमा मानुधने, ज्योती वाणी, छायांताई दाभाडे, बबिता पवार, शशिकला मानुधने, कोठावदे मॅडम, व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
    आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी त्यांना धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या