-
*एरंडोलमध्ये मैत्री सेवा फाऊंडेशनतर्फे ११ जानेवारीला ‘ मॅरेथॉन २.० ’ चे भव्य आयोजन……!*
एरंडोल प्रतिनिधी – धावपळीच्या जीवनात आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एरंडोल शहरात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. मैत्री सेवा फाउंडेशन, तिवारी फाउंडेशन आणि बालाजी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक तास आरोग्यासाठी’ ही संकल्पना घेऊन ‘ एरंडोल रन मॅरेथॉन २.०’ चे आयोजन ११ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.
स्पर्धेचे मुख्य आकर्षण आणि तपशील:
गेल्या वर्षी २८९० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला होता. यंदाही हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सदर स्पर्धेचा ११ जानेवारी २०२६ रोजी रविवारी सकाळी ५ वाजेपासून टेनिस क्लब, एरंडोल येथून प्रारंभ होणार आहे.आरोग्याप्रती जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेत सर्वांना सहभागी होता यावे यासाठी अत्यल्प शुल्क ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारण नागरिकांसाठी २०० रुपये व विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत म्हणून केवळ १०० रुपये सहभाग शुल्क असणार आहे.
नोंदणी केलेल्या प्रत्येक स्पर्धकाला उच्च प्रतीचे टी-शर्ट, मेडल, बॅग आणि सकस अल्पोपहार देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ जानेवारी २०२६ ही अंतिम तारीख आहे. तरी इच्छुकांनी खालील केंद्रांवर आपली नोंदणी निश्चित करावी.
१. मैत्री ग्राहक सेवा केंद्र (तहसील जवळ) – ९६७३८६८८८३
२. मेट्रोपोलीस पॅथॉलॉजी (माळीवाडा कॉर्नर) – ८८८८६५६६४०
३. एम. एस. कन्स्ट्रकशन (आंबेडकर चौक) – ७०३८७९३४४४
४. अंबिका मेडिकल (गांधीपुरा) – ९०९६२३९६८४
एरंडोल शहर व परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींनी या आरोग्यदायी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९१५८२९६९६२ / ८२०८३०६७३० या क्रमांकावर संपर्क साधावा.
