- *एरंडोलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला ज्येष्ठ नागरीक संघाचा अप्रतिम कार्यक्रम………..!*
*नगराध्यक्ष, नगरसेविकांसह प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न………!*एरंडोल प्रतिनिधी – येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जेष्ठ नागरिक संघाचा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर यांच्यासह नगरसेविकांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.सुरुवातीला साने गुरुजी लिखित खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हणण्यात येवून अहिल्यादेवी होळकर प्रतिमा पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. गितांजली ठाकूर उपस्थित होत्या.
सर्वप्रथम महिला संघाच्या अध्यक्षा शोभा साळी यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांसह प्रमुख पाहुणे डॉ . नरेंद्र ठाकूर आणि उपस्थित नगरसेविकांचा सत्कार महिला संघाच्या पदाधिकार्यांनी केला. तसेच या कार्यक्रमात ज्या महिलांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झालीत अशा २२ भाग्यवान महिलांचा सत्कार करण्यात येवून डिसेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांचा वाढदिवस होता अशा ८ महिलांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ महिला संघाच्या उपाध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी मनोगतातून लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संसारात आलेले अनुभव व्यक्त केले. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी ज्येष्ठ महिला संघाच्या उपक्रमाचे कौतुक करून देणगी जाहीर केली तसेच संघाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी संघास नीता तिवारी आणि शालिनी कोठावदे यांनी देखील देणगी दिली.
सूत्रसंचालन नंदा शुक्ला, प्रास्ताविक शोभा साळी तर आभार शशी पांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ महिला संघाच्या सर्व भगिनींनी परिश्रम घेतले.शेवटी स्वादिष्ट नाश्त्याचे प्रायोजक आशाताई पाटील (वावडदे) आणि स्वाती पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
