- एरंडोलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे सत्कार कार्यक्रम संपन्न
उत्कृष्ट कार्य करणार्या महिलांचा झाला सत्कार-स्तुत्य उपक्रम- एरंडोल प्रतिनिधी – येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे महिला मंडळ अध्यक्षांसह उल्लेखनिय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार, वाढदिवस आणि लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
येथील सरस्वती कॉलनीत आयोजित कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात येवून साने गुरुजी लिखित, खरा तो एकाच धर्म प्रार्थना म्हणण्यात आली. दिप प्रज्वलन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. गितांजली ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जेष्ठ महिलांच्या आरोग्य, आहारावर मार्गदर्शन केले. 16 महिला मंडळाच्या अध्यक्षांसह गोपीगोल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते, गोशाळेच्या उल्लेखनीय कामाबद्दल माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, महिला संघाला सुधाकर काळे लिखित 12 पुस्तके दिल्याबद्दल रजनी सुधाकर काळे, जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला संघाच्या अध्यक्षा शोभा साळी यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघाच्या उपाध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केेले. लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचा सत्कार तसेच जानेवारीमध्ये वाढदिवस असणार्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. निता तिवारी यांनी सुंदर भजन म्हटले. प्रास्ताविक शोभा साळी यांनी केले. सूत्रसंचलन शशी पांडे यांनी तर आभार नंदा शुक्ला यांनी मानले. उषाकिरण खैरनार मॅडम यांनी पसायदान म्हटले. आशा महाजन, मंगला पाटील, अरुणा पाटील, ठक्करताई यांनी संघाला देणगी दिली. जैन भाभी यांनी देखील 15 खुर्च्या देऊन महिला संघाला सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उज्वला राठी, इंदिरा पाटील, भारती वारुळे, कुसूम पाटील, निर्मला लाळगे, संध्या चौधरी यांनी परिश्रम घेतले.
