- एरंडोल एमआयडीसी साठी शासनाकडे पाठपुरावा.. तसेच एरंडोल आगारात नवीन 10 एस. टी.बसेस लवकरच दाखल होणार..
आमदार अमोल पाटील यांची पत्रकार परिषदेत माहितीएरंडोल प्रतिनिधी :-येथील एमआयडीसीच्या प्रश्नासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करीत असून स्थळ सर्वेक्षण झाल्यानंतर लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी एरंडोल शिवार व उमरदे शिवारातील जमीन प्रस्तावित असल्याची माहिती आमदार अमोल पाटील यांनी येथे गुरुवारी ३ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या संपर्क कार्यालयात दुपारी घेतल्याने पत्र परिषदेत
यावेळी शिवसेनेचे शालिग्राम गायकवाड, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, संभाजी पाटील ,कुणाल महाजन, मयूर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते
माजी आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात एमआयडीसीच्या प्रस्तावासाठी शासन दरबारी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु दरम्यानच्या काळात हा प्रश्न रेंगाळला होता. आता युवा आमदार अमोल पाटील यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एरंडोल चा एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले, व त्यांना हा प्रश्न बेरोजगारी दूर करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न मार्गी लावण्याची संकेत दिले. परंतु आता शासनाकडून एमआयडीसी प्रश्नी प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेण्यास कधी सुरुवात होईल याची जनतेला प्रतीक्षा आहे. आमदार अमोल पाटील हे स्वतः युवा नेतृत्व असल्याने त्यांना बेरोजगारीच्या प्रश्नाची जाण आहे म्हणून त्यांनी युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासन दरबारी प्रयत्न करीत आहेत. याबाबत त्यांचे युवा वर्गात व नागरिकांकडून कौतुक केले जात आहे
पद्मालय क्रमांक दोन व अंजनी मध्यम प्रकल्प या प्रकल्पांची रखडलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच निधी उपलब्ध होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील अशी माहिती देण्यात आली
एरंडोल बस आगारासाठी आठवड्याभरात दहा नवीन बस गाड्या उपलब्ध होणार असून एरंडोल बस स्थानकाचे नूतनीकरणाचा शुभारंभ लवकरच होणार आहे असेही आमदार अमोल पाटील यांनी सांगितले

