एरंडोल ( प्रतिनिधी )
येथे यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाच्या आय टी आय काॅलेजच्या क्रिडांगणावर ४,५ व ६ ऑक्टोबर २०२४ रोजी एरंडोल क्रिकेट क्लब व सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ भावी आमदार चषक २०२४ ‘ जिल्हास्तरीय भव्य सुपर खन्ना बाॅल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.या सामन्यांमध्ये ओम साई क्रिकेट क्लब, जामनेर ची टीमने प्रथम क्रमांकाचे ५१००० रूपयांचे पारितोषिक मिळाले.द्वितीय क्रमांकाचे ३१००० रूपयांचे पारितोषिक एरंडोल येथील पांडव क्रिकेट क्लबला मिळाले.तर तृतीय क्रमांकाचे २१००० रूपयांचे पारितोषिक चाळीसगावच्या लक्ष्मी क्रिकेट क्लबला मिळाले.तसेच एम सी सी क्रिकेट क्लब, पारोळा टीमला चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.रविवारी ६ ऑक्टोबर २०२४ रोजी विजेत्या संघांना व उत्कृष्ट खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन हे होते.तसेच व्यासपीठावर डॉ.राजेंद्र चौधरी,राजू आबा चौधरी, गोरख चौधरी, राहुल तिवारी, डॉ.सुधीर काबरा, कैलास महाजन,जावेद मुजावर हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मॅन ऑफ द टुर्नामेंट चे पारितोषिक अजय पाटील, जामनेर यांना मिळाले तर उत्कृष्ट फलंदाजाचे पारितोषिक म्हणून चाळीसगाव संघातील शिंदे यांना देण्यात आले.तसेच उत्कृष्ट गोलंदाजाचे पारंपरिक एरंडोल संघातील हितेश यांना देण्यात आले.या गुणवंत खेळाडूंना देखील या प्रसंगी पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तीन दिवसीय भावी आमदार चषक २०२४ च्या सामन्यांच्या यशस्वी आयोजनासाठी एरंडोल क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नितीन पाटील, खजिनदार सुयोग महाजन, निखिल काबरा, राधेश्याम चौधरी,सौराज पेंदाम, शशिकांत चौधरी तसेच क्रिकेट क्लबच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.या सामन्यांमध्ये एरंडोल, धुळे, पारोळा, धरणगाव, जामनेर, फैजपूर,कासोदा, म्हसावद,फेसरडी धरणगाव तसेच परिसरातील जवळपास १६ संघांनी सहभाग घेतला होता.सामने पाहण्यासाठी परिसरातील ५०० ते ६०० क्रिकेटप्रेमींनी तिन्ही दिवशी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली व खेळाचा आनंद घेतला.