- *एरंडोल डि.डी.एस.पी.महाविद्यालयात कार्यशाळेद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन……..!*
एरंडोल प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल संचलित डि.डी.एस.पी.महाविद्यालयात १९ जानेवारी २०२६ रोजी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अमित पाटील हे होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.आनंदराव पाटील ,प्राचार्य डॉ.अनिल पाटील, शालिग्राम गायकवाड, समाधान पाटील, प्रविण पाटील,प्रा.डाॅ.संदीप नेरकर यांची उपस्थिती होती.
प्रा.डाॅ.शैलेशकुमार वाघ (चोपडा),मयुरी अनुप देशमुख ( माती परीक्षण कार्यशाळा जळगांव), ईश्वर पवार ( मंडळ कृषी अधिकारी एरंडोल), किशोर साळुंखे ( उपकृषी अधिकारी एरंडोल) यांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.
मनीषकुमार गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली पाहिजे.असे आवाहन केले.
प्रास्ताविक प्रा.डॉ.साळुखे यांनी केले.सुत्रसंचालन प्रा.डाॅ.मिना काळे व प्रा.सुनील सजगणे यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा. डॉ.उमेश गवई यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर,प्रा.डाॅ.स्वाती शेलार,प्रा.विजय गाढे, डॉ.सचिन पाटील,प्रा.किशोर वाघ यांच्यासह इतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
