एरंडोल प्रतिनिधी — येथील ब्रिटिश कालीन तहशिल कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात आली असून त्यात निघालेले जवळपास ४० लाख रुपये किमतीचे सागवान लाकूड निवेदा न काढता केवळ १ लाख ९१ हजार रुपयाचा शासकीय भरणा दाखउन रात्रीचे वेळी परस्पर विक्री करण्यात आली असून यात लाखो रुपयांचा गैर व्यवहार सार्वजनिक बांधकाम विभाग एरंडोल यंत्रणेने केल्याचा खळबळ जनक आरोप जिल्ह्याचे माजी पालक मंत्री डॉ सतीश पाटील यांनी गुरुवारी येथे बोलावलेल्या तातडीच्या पत्र परिषदेत केला या मुळे महसूल व सा बा विभाग यंत्रणान मध्ये खळबळ माजली आहे
एरंडोल येथील तहशील कार्यालयाचे बाहेर दुपारी डॉ सतीश पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्र परिषदेत रात्रीतून सागवान लाकूड वाहून नेण्या पेक्षा दिवसा का नेले नाही या मागे गौड बंगाल काय आहे असा सवाल त्यांनी केला लोकप्रतिनिधीच्या दडपशाहिने सदरचा गैर व्यवहार झालेला आहे असाही आरोप करण्यात आला १३२ वर्षात एरंडोल तहशील कार्यालयाची इमारतीत पाण्याचा थेंब ही गळत नसताना एन पावसाळ्यात नव्या इमारतीच्याबांध कामाचे भूमिपूजन करून केवळ राजकीय लाभ घेण्याचा हा लोकप्रतिनिधीचा केविलवाणा खटाटोप असल्याचा टोलाही त्यांनी लगावला जुनी इमारत जमीनदोस्त झाल्यामुळे नोंदणी कार्यालय तर तहशील कार्यालय १ कि मि अंतरावर बी एस एन एल कार्यालयात स्थलांतरीत केल्यामुळे नागरिकना मोठ्या प्रमानावर हाल सोसावे लागत आहे अशी माहिती त्यांनी दिली तहशील कार्यालय लांब अंतरावर गेल्या मुळे वेंडर लोकांची मोठी गैर सोय झाली आहे
एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी (छोटू भगत) यांनी लेखी तक्रार केली होती म्हणून मला तातडीने पत्र परिषद घ्यावी लागली डॉ सतीश पाटील यांनी २७०० कोटींच्या कामाचा गाजावजा व मतदारसंघासाठी भरपूर निधी आणल्याचा दावा याबाबी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या आहे अशी सडकून टिका केली लाडकी बहीण योजना ही केवळ मतदाराना आकर्षित करण्यासाठीं असून या मुळे इतर योजनानचा निधी या योजनेकडे वळविण्याचा आरोप करण्यात आला
पत्र परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ राजेंद्र देसले शहर अध्यक्ष ईश्वर बिरहाडे आनंदा चौधरी विनोद पाटील रवींद्र देवरे उमेश पाटील संदीप वाघ एन डी पाटील दत्तू पाटील जगदीश पाटील दिपक आहिरे विजय पाटील लीलाधर पाटील योगराज महाजन आदि कार्यकर्ते उपस्तीत होते