- *एरंडोल तालुका केळी उत्पादक शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी मयुर पाटील यांची निवड…..!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील रवंजे येथील मयुर गोकुळ पाटील यांची एरंडोल तालुका केळी उत्पादक शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र संघाचे राज्याध्यक्ष किरण चव्हाण यांच्याकडून प्राप्त झाले आहे.मयुर पाटील हे बी एस्सी ( ॲग्री. ) आहेत.त्यांचे वडील गेल्या २० ते २५ वर्षांपासून केळी उत्पादक शेतकरी असून चालू वर्षात या परिवाराने ८ एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे.त्यांच्या निवडीबद्दल केळी उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या परिवाराने केळी पिकामध्ये विविध प्रयोग केले असून केळी उत्पादकांविषयी त्यांची तळमळ आणि त्याविषयी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.