- *एरंडोल तालुक्यात अवकाळीने घातला धुमाकूळ,१ बैल व ४ शेळ्या ठार, घरांची पडझड व विजेचे खांब मोडून पडले……!*
![]()
एरंडोल – मंगळवारी ६ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दिड ते दोन तास थैमान घातले.त्यात एरंडोल येथे वीज पडून ४ शेळ्या दगावल्या.तर जळू येथे वीज पडून १ बैल ठार झाला.खडके खु.येथे पत्र्याच्या शेडचे भींत पडल्यामुळे नुकसान झाले.तसेच गणेशनगर व सोनबर्डी येथे अंशतः घरांची पडझड झाली.
अवकाळीचा मार पडल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.दरम्यान गालापूर व एरंडोल शेत शिवारात जवळपास २५ ते ३० विजेचे खांब कोसळले.विद्यूत तारा तुटल्यामुळे सायंकाळी ५.३० वाजेपासून रात्री उशिरापर्यंत शहरातील विजपुरवठा खंडित झाला.विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता प्रशांत महाजन आपल्या सहकाऱ्यांसह विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत होते.
उशिरा लागवड झालेल्या जवळपास उभा असलेला ५ ते १०% मका,आंबे यांना अवकाळीचा फटका बसला.
मंगळवारी विवाहाची मोठी तिथी असल्यामुळे लग्न घरातील मंडळीचे तारांबळ उडाली.उभे मंडप वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याच्या घटना घडल्या.लग्नसोहळ्यात अचानक आलेल्या या अस्मानी विघ्नामुळे लग्नासाठी आलेले आप्तेष्ट,नातेवाईक, पाहुणे मंडळी व उपस्थितांच्या आनंदावर विरजण पडले.विशेष हे की मे हिटच्या दिवसांमध्ये भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले व हवेत गारवा जाणवू लागला.