Home » महाराष्ट्र » *एरंडोल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, एरंडोल विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव………..!*

*एरंडोल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, एरंडोल विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव………..!*

  1. *एरंडोल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, एरंडोल विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव………..!*

    प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.ऐन तोंडाशी आलेला घास पावसाच्या पाण्यात गेला आहे.हे गंभीर संकट पाहता तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी.असा एकमुखी ठराव एरंडोल वि.का.सोसायटीच्या २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र दोधू चौधरी हे होते.
    श्री क्षेत्र पद्मालय ते राजूर तीर्थक्षेत्रासोबत जोडण्यासाठी जालना ते जळगाव रेल्वे प्रकल्पात पद्मालयचा समावेश करण्यात यावा.तसेच समृध्दी महामार्गाला जळगाव शहर जोडण्याच्या प्रकल्पात नेरी येथून पद्मालयाला जोडण्यात यावे.असे दोन महत्वपूर्ण ठराव सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.सदर ठराव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
    एरंडोल तालुक्यासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात यावी.असाही ठराव संमत करण्यात आला.
    सुर्योदय जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरूण माळी यांची महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ खान्देश विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व वि.का.सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजधर महाजन यांना ज्ञानमाता सेवाभावी संस्था पुणे तर्फे माहिती अधिकार क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच लोटन गबा धनगर यांच्या नर्सिंग महाविद्यालयाला मान्यता मिळाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी संस्थेचे चेअरमन राजेंद्र चौधरी,व्हाईस चेअरमन राजधर महाजन, विजय महाजन, रमेश महाजन, दुर्गादास महाजन, रविंद्र महाजन, अरूण माळी, राजेंद्र महाजन, ईश्वर पाटील, पंडित सुर्यवंशी, नितीन महाजन, युवराज महाजन,योगराज महाजन,इच्छाराम महाजन, ज्ञानेश्वर पाटील, देविदास महाजन, मन्साराम महाजन, सुमनबाई माळी,निर्मलाबाई महाजन, अरुण पाटील, गोपाल पाटील ,आय जी माळी. सुदर्शन माळी सचिव बापू पाटील, कर्मचारी युवराज महाजननिंबा महाजन व इतर सभासद उपस्थित होते.
    प्रास्ताविक राजेंद्र चौधरी, सुत्रसंचलन राजधर महाजन व आभारप्रदर्शन रविंद्र महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या