-
*एरंडोल तालुक्यात जि.प.गट व पंचायत समिती गण संख्या जैसे थे…….!*
एरंडोल प्रतिनिधी – लवकरच होऊ घातलेल्या जळगाव जिल्हा परिषद व एरंडोल पंचायत समिती निवडणुकांसाठी गट व गणांच्या रचनेला शासनाकडून मंजुरी मिळाली असून ती जाहीर करण्यात आली आहे.एरंडोल तालुक्यात जि.प.गट ३,विखरण – रिंगणगांव,तळई – उत्राण, कासोदा – आडगाव याप्रमाणे ३ गट आहेत.तर पंचायत समितीचे ६ गण आहेत.विशेष हे की एरंडोल तालुक्यातील जि.प.गट व गणांची संख्या रचना आधीप्रमाणेच करण्यात आली आहे.गट व गणांची रचना जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
गणात समाविष्ट असलेले गावे पुढील प्रमाणे.
*१) विखरण* – विखरण,वरखेडी, उमरदे,पातरखेडे,भालगांव बु., टोळी खु.जवखेडे खु.जवखेडे बु.,पिंप्री प्र.चां., पिंप्री बु.,पिपळकोठे खु.पिंपळकोठे बु.
*२)रिंगणगांव* – रवंजे खु., रवंजे बु.,खर्ची खु.,खर्ची बु.,रिंगणगांव,पिंपळकोठे प्र.चां,सावदे प्र.चां.,टाकरखेडे,कढोली, वैजनाथ, खेडी खु.,दापोरी.
*३)तळई* – तळई, अंतुर्ली, जवखेडे सिम,गालापूर, खडके बु., वनकोठे,खेडगांव, खडके खु., खडके सिम.
*४) उत्राण* – उत्राण अ.ह.,उत्राण गु.ह.,नागदुली,भातखेडे,ताडे, हणमंतखेडे सिम,बाम्हणे,निपाणे,आनंदनगर.
*५)कासोदा*-कासोदा.
*६)आडगाव*-आडगाव,मालखेडे,फरकांडे,नानखुर्द बु.,नानखुर्द खु., हणमंतखेडे बु.,धारागीर,जळू, सोनबर्डी.
दरम्यान गट व गणांमधील आरक्षण निश्चिती अजून व्हायची आहे.आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेगाने सुरू होतील.गेल्या निवडणुकीत जि.प.गटाच्या ३ जागांपैकी २ महिला राखीव होत्या व विखरण – रिंगणगांव ही जागा सर्वसाधारण राखीव होती.तळई – उत्राण गटातील जागा महिला अनुसूचित जातीसाठी राखीव होती व कासोदा – आडगाव गटाची जागा सर्वसाधारण महिला राखीव होती.२१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हा प्रशासनाकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
