- एरंडोल नगराध्यक्ष आरक्षण सोडती मुळे प्रस्थापितांना मोठा धक्का…..
एरंडोल प्रतिनिधी – आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६ ऑक्टोबर २०-२५ रोजी नगरअध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली दरम्यान एरंडोल नगर नगरपरिषदेचे नगराअध्यक्ष पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी सुटल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसला आहे…
विशेष हे की एरंडोल नगरपालिका स्थापनेपासून आज तागायत आरक्षणाच्या निकषानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाची संधी चालून आली आहे.
अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून सर्वच राजकीय पक्षांना तुल्यबळ असा उमेदवार शोधून सत्ता आपल्याच पक्षाकडे कशी राहील यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
शहरात भारतीय जनता पार्टी व शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट व महाविकास आघाडी या पक्षांकडून नगरध्यक्षपदासाठी कोणता उमेदवार दिला जातो याकडे शहरवासी यांचे लक्ष लागले आहे.
