Home » राजकीय » *एरंडोल न.पा.च्या उपाध्यक्ष पदी सुनिता रूपेश माळी यांची बिनविरोध निवड तर स्वीकृत सदस्य पदी डॉ.नरेंद्र पाटील व योगेश देवरे यांची एकमताने निवड…..!*

*एरंडोल न.पा.च्या उपाध्यक्ष पदी सुनिता रूपेश माळी यांची बिनविरोध निवड तर स्वीकृत सदस्य पदी डॉ.नरेंद्र पाटील व योगेश देवरे यांची एकमताने निवड…..!*

  1. *एरंडोल न.पा.च्या उपाध्यक्ष पदी सुनिता रूपेश माळी यांची बिनविरोध निवड तर स्वीकृत सदस्य पदी डॉ.नरेंद्र पाटील व योगेश देवरे यांची एकमताने निवड…..!*

    एरंडोल प्रतिनिधी  – येथे नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२ वाजता नगरपालिका सभागृहात पार पडली.नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर हे पिठासन अधिकारी म्हणून सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी होते.या सभेस २३ नगरसेवकांपैकी २२ नगरसेवक उपस्थित होते व एक नगरसेवक अनुपस्थित होते.यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी सुनिता रूपेश माळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.तर स्वीकृत सदस्य पदी डॉ. नरेंद्र पाटील व योगेश देवरे या दोघांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
    उपाध्यक्ष पदासाठी सुनिता माळी यांचे सुचक शिवसेनेचे गटनेते प्रा.मनोज पाटील हे होते.तर अनुमोदक छाया दाभाडे होत्या.
    डॉ. नरेंद्र पाटील यांच्या स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेना गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता.तर भाजपा व अपक्ष नगरसेवकांनी योगेश देवरे यांचा प्रस्ताव सादर केला होता.
    निवड प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी हितेश जोगी, कार्यालय अधीक्षक एस.आर.ठाकूर, महेंद्र पाटील,आर.के.पाटील यांनी कामकाज पाहिले.
    निवड जाहीर झाल्यानंतर आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुनिता माळी तसेच नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील व योगेश देवरे या तिघांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲड.किशोर काळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एस.आर.पाटील, डॉ.गितांजली ठाकूर,सुनील पाटील, रूपेश माळी,अनिल महाजन, आनंद दाभाडे,प्रशांत महाजन, रविंद्र महाजन,कृष्णा ओतारी,अमोल तंबोली, कल्पना पाटील,कमल पाटील, सत्यभामाबाई पाटील,आरती महाजन, पौर्णिमा देवरे, नितेश चौधरी, मनकरनाबाई चौधरी, नय्यमखां पठाण,नजमाबी कागजी, इतर नगरसेवक, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
    सत्कार सोहळ्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत वाजत गाजत विजयी मिरवणूक काढण्यात येऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विजयी मिरवणूकीची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या