Home » सामाजिक » *एरंडोल बस आगारातील कर्मचाऱ्याचा असाही प्रामाणिकपणा…….!*

*एरंडोल बस आगारातील कर्मचाऱ्याचा असाही प्रामाणिकपणा…….!*

  1. *एरंडोल बस आगारातील कर्मचाऱ्याचा असाही प्रामाणिकपणा…….!*
  2. एरंडोल प्रतिनिधी- येथील बस आगारातील कर्मचारी एस.टी.शेख यांना बसमध्ये सापडलेला मोबाईल त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून सुरक्षा रक्षक सोनार यांच्याकडे जमा केला.१९ जुलै २०२५ रोजी आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी सदर मोबाईल प्रवाशाला सुपुर्द केला.यावेळी स्थानक प्रमुख गोविंदा बागुल हे उपस्थित होते.
    १८ जुलै २०२५ रोजी १३२८ क्रमांकाच्या नाशिक – धरणगाव बसमध्ये पारोळा शेळावे फाटा प्रवास करणारे प्रवासी सुरेश रामदास नावडे यांचा विवो कंपनीचा मोबाईल बसमध्ये पडला होता.एरंडोल येथे सदर बस आगारात परत आल्यावर कर्मचारी शेख यांना मोबाईल सापडला.
    शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.प्रवासी नवाडे यांनी शेख यांना धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या