Home » सामाजिक » *एरंडोल येथील महाजन कुटुंबाच्या घरी स्थापन केलेल्या कन्हेर कानबाईच्या मुर्त्या ठरल्या विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण…….!*

*एरंडोल येथील महाजन कुटुंबाच्या घरी स्थापन केलेल्या कन्हेर कानबाईच्या मुर्त्या ठरल्या विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण…….!*

  1. *एरंडोल येथील महाजन कुटुंबाच्या घरी स्थापन केलेल्या कन्हेर कानबाईच्या मुर्त्या ठरल्या विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण…….!*
  2.  

    एरंडोल ( प्रतिनिधी )
    दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एरंडोल शहरात ३ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानबाई उत्सव मोठ्या उत्साहाने घरोघरी कुटुंबातील सर्व नातेवाईक एकत्र येऊन साजरा करण्यात आला.खान्देशात कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने या देवतांच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.
    या दिवशी एरंडोल येथील बुधवार दरवाजा परिसरातील गोरख नारायण महाजन व कृष्णा नारायण महाजन यांच्या निवासस्थानी जवळपास १३१ वर्षांची परंपरा असलेल्या कन्हेर व कानबाई यांच्या मुर्तींची पुजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.कानबाईची पुजा करण्यासाठी भाऊबंदकीतील कुटुंबांची एकच गर्दी झाली.यावेळी देवीच्या आरतीसह कानबाईच्या गाण्यांचे गायन करण्यात आले.त्यांची आजी लक्ष्मीबाई यांचे श्रध्दास्थान असलेल्या या कन्हेर व कानबाईच्या मुर्त्या पंचधातू व चंदनाच्या लाकडापासून स्वत: बनवून घेतल्या.विशेष म्हणजे या मुर्त्यांची पुजा यावर्षी चौथ्या पिढीकडून करण्यात आली.संपुर्ण खानदेशात या कन्हेर व कानबाईच्या मुर्त्या एकमेव असून विसर्जनाच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या.
    या कानबाईजवळ गावातील काही भाविक नवस मानतात तर काही भाविक देवीला मानलेला नवस फेडण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येत असतात.रविवारी सायंकाळी कानबाईची गाणी व भजनाचा कार्यक्रम झाला.दिवसभर कन्हेर व कानबाईच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती.
    दुसऱ्या दिवशी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सोमवारी सकाळी चौरंगावर ठेवलेली कानबाई डोक्यावर घेऊन वाजत गाजत, फुगड्या खेळत,ढोल,ताशे,संबळ व ढोलकी वाजवत कानबाईची गाणी म्हणत विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली.विशेष म्हणजे जहाँगीरपुरा येथील बालमित्र मंडळ व कानबाई उत्सव मित्र मंडळ,चौधरी वाडा यांनी या मिरवणूकी सुरेल आवाजात वाद्यांच्या तालावर कानबाईची गाणी सादर केली.याप्रसंगी गावातील नागरिकांनी त्यांचे कौतुक करीत प्रोत्साहन दिले.या मिरवणुकीत गावातील घरोघरी स्थापना केलेल्या कानबाया डोक्यावर घेऊन असंख्य स्रिया सहभागी झाल्या.अंजनी नदीच्या तीरावरील महादेव मंदिराजवळ ही मिरवणूक आणली गेली.नंतर नदीच्या तीरावर दहिभाताचा नैवेद्य अर्पण करून व देवीची आरती म्हणत कानबाईचे विधीवत पुजन करण्यात आले.यावेळी मुर्त्या व नारळ व्यतिरिक्त बाकी सर्व पुजेचे साहित्य अंजनी नदीच्या पात्रात विसर्जित करून पुन्हा कन्हेर कानबाईंना वाजत गाजत घरी आणण्यात आणण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या