- *एरंडोल येथे आमदार अमोल चिमणराव पाटील व जनजाती प्रदेश अध्यक्ष ऍड. किशोर काळकर यांच्या उपस्थितीत २० वे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी घेतले उत्साहात पदग्रहण………!*एरंडोल प्रतिनिधी – येथे मरिमाता चौकापासून नगरपालिका कार्यालयापर्यंत फटाक्यांची आतषबाजी करीत वाजत गाजत मिरवणूक काढून नगरपालिका कार्यालयानजीक उभारलेल्या मंडपात नुतन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर व २३ नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा ३० डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.यावेळी नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर यांनी नगराध्यक्ष पदाची शपथ घेतली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल चिमणराव पाटील हे होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर,भाजपा जनजाती प्रदेश अध्यक्ष ॲड.किशोर काळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, नगरसेवक प्रा.मनोज पाटील, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी भैरवीताई पलांडे,माजी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन,जगदीश पाटील,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष एस.आर.पाटील, शालिग्राम गायकवाड, अनिल महाजन, जयश्री पाटील,बबलू चौधरी, रविंद्र जाधव, डॉ. नरेंद्र पाटील, रूपेश महाजन, गोपाल पाटील, नगरसेवक व नगरसेविका, महायुतीची नेते मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.मनोज पाटील यांनी केले.सुत्रसंचलन डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले.
एरंडोल या शहराची ओळख ऐतिहासिक शहर म्हणून आजवर झालेली आहे.येत्या ५ वर्षात शहराचा सर्वांगीण विकास करून एक विकासाचे आधुनिक शहर ओळख करून देण्याचा नवा इतिहास घडवून या.असा संकल्प आपण सर्व जण करू या असे आवाहन आमदार अमोल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
