- *एरंडोल येथे एस टी भाडेवाढ विरोधात उबाठा गटाचा एल्गार …..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे एस टी महामंडळाने भाडेवाढ केल्याच्या विरोधात येथे ३० जानेवारी २०२५ रोजी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारात उबाठा गटातर्फे जवळपास अर्धा तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.यावेळी संतप्त शिवसैनिकांनी १५%भाडेवाढीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.या आंदोलनामुळे यामुळे बसस्थानकातून एकही गाडी बाहेर जाऊ शकली नाही व बाहेरून एकही बस आत शिरली नाही.
एका बाजूला महिलांसाठी लाडकी बहिण योजना व जेष्ठ नागरिकांसाठी एस टी प्रवास भाड्यात सवलत अशा योजना राबविण्यात आल्या.तर दुसऱ्या बाजूला १५% प्रवासी भाडेवाढ करून प्रवाशांना भुर्दंड दिला.यावरून शासन प्रवाशांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ( उबाठा) उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आंदोलन प्रसंगी केला.
या आंदोलनात गुलाबराव वाघ(जिल्हा संपर्कप्रमुख ), दशरथभाऊ महाजन ( जिल्हा उप संपर्क प्रमुख), निलेश चौधरी ( जिल्हा युवासेना प्रमुख),रमेश अण्णा महाजन ( एरंडोल तालुका समन्वयक),रविंद्र अण्णा चौधरी(तालुका प्रमुख एरंडोल),
जानकीराम पाटील ( जि.प.माजी उपाध्यक्ष), रमेश माणिक पाटील ( विधानसभा क्षेत्र प्रमुख), प्रमोद महाजन (एरंडोल शहर प्रमुख), जयदीप पाटील ( धरणगांव तालुका प्रमुख), बाळासाहेब पाटील ( पारोळा तालुका प्रमुख), हिरामण पाटील ( विभाग प्रमुख), समाधान पाटील ( शाखा प्रमुख),अरूण महाजन, अनिल महाजन ( उप युवा सेना प्रमुख, एरंडोल), संजय महाजन (माजी नगरसेवक), किशोर महाले( उप तालुका प्रमुख, एरंडोल),गुलाबसिंग पाटील ( उप जिल्हा प्रमुख, युवासेना), जगदीश पाटील (विधानसभा क्षेत्र प्रमुख, एरंडोल) हे सहभागी झाले.यावेळी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
या आंदोलनाला प्रवासी गोटातून उत्फुर्त प्रतिसाद व पाठींबा मिळाला.