- *एरंडोल येथे काॅंग्रेस तर्फे शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत तहसीलदारांना निवेदन…..!
एरंडोल प्रतिनिधी – येथे तालुका काँग्रेस कमिटी तर्फे शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ३ मार्च २०२५ रोजी तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.शेतीमालाला उत्पादन खर्चानूसार भाव मिळावा.शेती अवजारे,बी बियाणे,खते, किटकनाशके यावर जी एस टी लावू नये.शेतकरी मागतील तेंव्हा शेतकी संघ व फ्रुटसेल सोसायटी मार्फत खते,बी बियाणे यांचा पुरवठा व्हावा.पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा विजपुरवठा व्हावा.या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
निवेदन देताना काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष प्रा.आर.एस.पाटील, सय्यद इमरान,चेतन पाटील,कमर अली सय्यद,शेख हुसेन, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.प्रशांत पाटील,शेख कलीम,शेख सांडू,मुकुंदा ठाकूर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.