- एरंडोल येथे खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव उत्साहात
-
एरंडोल प्रतिनिधी : येथे शहरातील अष्टविनायक कॉलनी अष्टविनायक मित्र मंडळ व राहुल सुधाकर ठाकूर यांच्या मित्र परिवारातर्फे १ नोव्हेंबर रोजी खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून उत्साहात साजरा करण्यात आला. सदर जन्मोत्सव कार्यक्रम हा तालुक्यातून एकमेव असावा भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती.
- यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे शहरातून हा एकमेव कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी ज्योत प्रज्वलनाच्या वेळी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. दि. 2 नोव्हेंबर रोजी एकादशी व्रत असल्यामुळे भाविकांच्या दर्शनासाठी रीघ सुरुच होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल सुधाकर ठाकूर, ठाकूर परिवार, अष्टविनायक मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
