-
*एरंडोल येथे ‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात महाआरतीने शिवमहापुराण कथेची सांगता……….!*

एरंडोल प्रतिनिधी – येथे गुढीपाडव्यापासून जहांगीर पुरा भागात ‘ शिवमहापुराण ‘ कथेची उत्साहात प्रारंभ होऊन रामनवमीच्या दिवशी महाआरती सह ‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात कथेची सांगता झाली.जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कथाप्रवचनकार गोपालदास महाराज,सांजोरीकर यांनी सप्ताहात ” मानवाने आपल्या जीवनात सत्कर्म करणे आवश्यक आहे.प्रत्येक कर्माचे फळ हे या जन्मातच मिळते.” असे जीवनसत्य व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.नितीन पाटील, उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे,व्हि.के.महाजन,ऋषिकेश महाजन, सदानंद पाटील, अविनाश जाधव, प्रशांत लोहार,देव जाधव, जितेंद्र पाटील,टोनी शिरवाणी,बंटी शिरवाणी,ओम पाटील,धिरज पाटील, भावेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
