- एरंडोल प्रतिनिधी – येथे सुर्योदय जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे २ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते रामदास पिंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त तहसीलदार अरूण माळी होते.
- याप्रसंगी प्रा.शिवाजीराव अहिरराव, भगवान महाजन, गणेश महाजन, वसंतराव पाटील, नामदेव पाटील, विश्वनाथ पाटील,भागवत पाटील, पंडित महाजन, रविंद्र वाघ, रमेश माळी, सुभाष पाटील, रविंद्र लाळगे,आय.जी.माळी, रघुनाथ कोठावदे, पुरूषोत्तम महाजन, सुभाष दरशे, विश्वनाथ ब्रम्हे, घनश्याम महाजन, रघुनाथ पाटील,डि.एस.पाटील आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले.आभारप्रदर्शन उपाध्यक्ष जाधवराव जगताप यांनी केले.सुत्रसंचालन पी.जी.चौधरी यांनी केले.