-
एरंडोल येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन…
-
एरंडोल प्रतिनिधी- येथे दीपस्तंभ व आर्यन फाउंडेशन जळगाव तसेच स्वामी विवेकानंद केंद्र व योगेश्वरी नागरिक सहकारी पतसंस्था राखी हॉस्पिटल एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी पालक व शिक्षकांकरिता खानदेशातील सर्वात मोठी व प्रसिद्ध अशी व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे.
एरंडोल शहराच्या सर्वात प्रेरणादायी कार्यक्रम दीपस्तंभ व्याख्यानमाला यावर्षी देखील 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 असे तीन दिवसीय व्याख्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून सदर व्याख्यानमालेचे उद्दिष्ट हे सुसंस्कृत भावी पिढी घडविणे तथा करिअर करणाऱ्या युवकांना प्रेरणा मिळून त्यांच्या आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा व शहरातील पालक शिक्षकांना प्रबोधनात्मक प्रेरणा मिळावी या उद्देशाने गेल्या सतरा वर्षापासून कै.के एम महाजन सर व कै.डॉ. अनिल महाजन तसेच कै.डॉ.ब.तु.राठी यांच्या स्मरणार्थ सदर व्याख्यानमालेचे आयोजन हे रा.ती.काबरे विद्यालयाच्या पटांगणावर केले जात असून दिनांक 22 डिसेंबर 2025 सोमवार रोजी दीपक करंजीकर मुंबई उद्याचा भारत आणि आपण या विषयावर व्याख्यान होणार असून 23 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी शरद तांदळे पुणे माझा उद्योजकतेचा प्रवास या विषयावर व्याख्यान होणार आहे तर 24 डिसेंबर 2025 बुधवार रोजी धनश्री करमळकर मुंबई व नवीन काळे मुंबई यांचे तिची उत्तुंग भरारी व आकाशाचे खांब शोधणारे…. स्वयं! या विषयावर व्याख्याने होणार आहे सदर कार्यक्रमास रा.ती.काबरे विद्यालय. ग्रामीण उन्नती मंडळ व दादासो दि.श.पाटील विद्यालय एरंडोल यांचे सहकार्य लाभले आहे तरी तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजक दीपस्तंभ व्याख्यानमाला एरंडोल यांच्यातर्फे करण्यात आले आहे
