Home » सामाजिक » एरंडोल येथे निवृत्त सेवा संघाच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारणीची निवड….

एरंडोल येथे निवृत्त सेवा संघाच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारणीची निवड….

  1. एरंडोल येथे निवृत्त सेवा संघाच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारणीची निवड….

    एरंडोल प्रतिनिधी ;-येथे निवृत्त सेवा संघाची एरंडोल तालुका शाखेची ४२ वी वार्षिक सभा पंचायत समितीच्या प्रांगणात जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी तीन वर्षासाठी कार्यकारणीची घोषणा निरीक्षक धनराज पाटील व जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांनी घोषित केली. कनीराम परदेशी, सुरेश बोरकर, आयुब शहा, आशालता राणे, जगदीश महाजन, विश्वनाथ पाटील, शोभा वाणी, दिलीप वानखेडे, हिम्मत पाटील, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
    तालुका अध्यक्ष पंडित साळी, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, व गौतम अडकमोळ, सरचिटणीस भास्कर कोळी, चिटणीस भगवान चव्हाण, कोषाध्यक्ष धनसिंग पाटील, कार्याध्यक्ष रघुनाथ लाडगे, सल्लागार रघुनाथ कोठावदे, सुरेश सावंत, विजयसिंह पाटील, सुनील महाजन, एन डी पाटील, नारायण बोरसे, कार्यकारणी सदस्य मधुकर रघुवंशी, संतोष पाटील, तुकाराम पाटील, पुंडलिक सोनवणे गटाध्यक्ष तळई, शिवाजी जाधव गट अध्यक्ष रिंगणगाव , युवराज साबळे गटाध्यक्ष आडगाव, उषा किरण खैरनार महिला सल्लागार, एरंडोल गट अध्यक्ष, लीलाताई भोळे , महिला सदस्य सरिता रघुवंशी, शोभा पाटील , मंदाकिनी साळी, सुनंदा भांडारकर, शेख गफूर रफिक खान, लायक अली, अशी ३१ जणांची जम्बो कार्यकारणी घोषित करण्यात आली.
    निवृत्त सेवा संघाच्या सभागृहासाठी उषा किरण खैरनार, मालती वाघ, पंडित साळी, मधुकर रघुवंशी, व सरिता रघुवंशी यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या