Home » सामाजिक » एरंडोल येथे प्रथमच स्थापन झाला रोटरी क्लब ! चार्टर अध्यक्ष पदी डॉ . नरेंद्र ठाकूर तर मानद सचिवपदी प्रा . सोपान साळुंखे ह्यांनी स्वीकारला पदभार !

एरंडोल येथे प्रथमच स्थापन झाला रोटरी क्लब ! चार्टर अध्यक्ष पदी डॉ . नरेंद्र ठाकूर तर मानद सचिवपदी प्रा . सोपान साळुंखे ह्यांनी स्वीकारला पदभार !

  1. एरंडोल येथे प्रथमच स्थापन झाला रोटरी क्लब !
    चार्टर अध्यक्ष पदी डॉ . नरेंद्र ठाकूर तर मानद सचिवपदी प्रा . सोपान साळुंखे ह्यांनी स्वीकारला पदभार !

    एरंडोल प्रतिनिधी  – येथे नव्यानेच स्थापन झालेल्या रोटरी क्लब एरंडोल चा पद्ग्रहण सोहळा दिनांक ७सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात डी .डी .एस.पी .महाविद्यालय च्या सभागृहात संपन्न झाला .
    मुख्य अतिथी म्हणून रोटरीचे प्रांतपाल रो . ज्ञानेश्वर शेवाळे (३०३०) , रोटरीचे माजी प्रांतपाल सौ .रो . मंजू फडके , सहप्रांतपाल श्री . धनराज कासट ह्यांची उपस्थिती होती .
    ह्या प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल रो . ज्ञानेश्वर शेवाळे ह्यांनी रोटरी इंटरनॅशनल हि १०० वर्षाचा इतिहास असलेली , २०० पेक्षा जास्त देशामध्ये विस्तारलेली अशी सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था असल्याचा उल्लेख करत ” सेवा सर्वोपरी ” ह्या प्रमाणे अनेक सेवाप्रकल्प राबवित असल्याचे प्रतिपादन केले .
    मुख्य अतिथींचा परिचय प्रा . राखी पाटील ह्यांनी करून दिला .
    ह्या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या रो.मंजू फडके ह्यांनी रोटरीचे फायदे व नव्यानेच रोटरी सदस्य झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यात , व्यवसायात ” रोटरियन ” झाल्यावर व्यक्तिमत्वात होणारा परिपूर्ण व आदर्श बदल ह्यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले . रोटरी ने जगातील सगळ्यात मोठ्या अश्या आर्थिक दातृत्वाच्या माध्यमातून यशस्वी केलेली ” पोलिओ निर्मूलन मोहीम ” हि प्रत्येक रोटरियन साठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले .एरंडोल रोटरी क्लब च्या माध्यमातून

    समाजातील वंचित घटकांपर्यंत सेवा पोहोचविणे, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रांतील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त करून नवीन पदाधिकारी ह्यांचे अभिनंदन केले .

    रोटरी क्लब ऑफ एरंडोलचा हा पद्ग्रहण सोहळा हा केवळ औपचारिकता न ठरता समाजहिताच्या कार्यासाठी एक नवा संकल्प ठरेल अशी भावना एरंडोल रोटरी क्लब चे मुख्य प्रवर्तक ऍड . ओम त्रिवेदी ह्यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली . एरंडोल रोटरी क्लब चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतात
    आगामी वर्षातील कामाचा ध्यास मांडत “सामाजिक सेवेतून समाधान” हा मंत्र जपण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष पदी श्री . अरुण माळी व वैद्यकीय समिती प्रमुख म्हणून डॉ . फरहाज बोहरी ह्यांच्या समवेत इतर समिती प्रमुख ह्यांच्या कडे हि पदभार सोपविला .रोटरी क्लब एरंडोल चे मानद सचिव प्रा . सोपान साळुंखे ह्यांनी कार्यात पारदर्शकता व सातत्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
    ह्याप्रसंगी व्यासपीठावर जळगाव सेंट्रल क्लब चे अध्यक्ष रो . जितेंद्र बरडे , मानद सचिव केतन ढाके , श्री . महेंद्रजी रायसोनी ह्यांची उपस्थिती होती .
    ह्या पद्ग्रहण सोहळ्याप्रसंगी जळगाव सेंट्रल क्लब चे पदाधिकारी , पाचोरा क्लब चे डॉ . मुकेश तेली , जळगाव क्लब चे डॉ .राहुल मयूर , डॉ तुषार फिरके , एरंडोल शहरातील मान्यवर श्री . अमितदादा पाटील , प्रा . अनिल जी लोहार , प्रा. अनिल पाटील , श्री डॉ .राजेंद्र चोधरी , श्री . संजयजी जाधव , श्री . विजय जाधव , श्री . जगदीश पाटील , ऍड .नितीन चोधरी ,श्री . कृष्णा धनगर , डॉ . सौ गीतांजली ठाकूर , , ,प्रा . विजय शास्त्री , सौ .रूपा शास्त्री ,श्री .लीलाधर पाटील ,प्रा . सौ स्वाती शेलार ,डॉ अम्बरीन बोहरी ,डॉ . राहुल वाघ , डॉ . मुकेश चोधरी , डॉ उमेश पाटील , श्री . कल्पेश कलंत्री , श्री .सुभाष पवार ,श्री उल्हास लड्ढा ,डॉ प्रीती चोधरी ,श्री . नानासाहेब पारखे , श्री . ऍड . मधुकर देशमुख , सौ . शिवाली पाटील ,श्री . महेंद्र चोधरी , श्री . राहुल शिंपी , श्री . जाखीटे ,श्री . तेजस पाटील , डॉ आंचल पाटील ,सचिन जैन , ज्ञानेश्वर महाजन ,श्री तुषार मोने , हेमंत शर्मा , चंद्रकांत पारखे ,योगेश काबरा , श्री . गणेश बडगुजर , श्री शेखर पाटील सर , विशाल तिवारी , किशोर देवरे आदी उपस्थित होते .
    रोटरी क्लब एरंडोल तर्फे रो.ज्ञानेश्वर शेवाळे ह्यांच्या शुभ हस्ते एरंडोल पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री . बी. एस .चोधरी सर ह्यांच्या समवेत शहरातील उपस्थित सर्व डिजिटल व प्रिंट मीडिया च्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला .
    ह्या प्रसंगी , श्री . रतिलाल पाटील ,नितीन पाटील सर , जावेद मुजावर , कैलास महाजन , पंकज महाजन , कुंदन ठाकूर , सुधीर शिरसाठ ह्यांचा हि सन्मान करण्यात आला .
    रोटरी एरंडोल क्लब च्या ह्या पद्ग्रहण सोहळ्याचे सूत्रसंचालन जळगाव सेंट्रल रोटरी क्लब च्या अपर्णा भट – कासार ह्यांनी तर आभार एरंडोल रोटरी क्लब च्या उपाध्यक्षा डॉ . जुमाना बोहरी ह्यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या