Home » सामाजिक » *एरंडोल येथे बियर – बार असोसिएशन तर्फे प्रांताधिकारी यांना दिले निवेदन…..!*

*एरंडोल येथे बियर – बार असोसिएशन तर्फे प्रांताधिकारी यांना दिले निवेदन…..!*

  1. *एरंडोल येथे बियर – बार असोसिएशन तर्फे प्रांताधिकारी यांना दिले निवेदन…..!*


    एरंडोल प्रतिनिधी  – बियर बार वरील मुल्यवर्धीत कर ( व्हॅट )५% टक्क्यां वरुन १०% करण्यात आला असून वाढीव १५% वार्षिक परवाना नुतनीकरण फी वाढविल्याने एरंडोल तालुका बियर – बार रिटेल वाइन असोसिएशन तर्फे शासनाकडे आपल्या व्यथा मांडण्यासाठी प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले .
    गेल्या काही वर्षांपासून बियर – बार मधील मद्य विक्री वरती ५% मुल्यवर्धीत कर ( व्हॅट टॅक्स ) होता. शासनाच्या वर्ष २०२३ च्या जीआर मध्ये तो टॅक्स १०% करण्यात आला. परमीट रूम धारकांना हा टॅक्स शासनाने लादल्यामुळे व्यवसाय करण्यास खूप अडचणी येत असल्याने ह्या १०% टॅक्स मुळे व्यवसाय दिवसेदिवस डबघाईस आला आहे. परिणामी मद्य विक्री व्यवसायावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे.त्यामुळे १०% टॅक्स कमी करून तो ५% करण्यात यावा.पहिल्या स्टेजला म्हणजे उत्पादन शुल्क जर २% वाढला तर शासनाचा खूप आर्थिक फायदा होईल. तसेच शासनाने वर्ष २०२५-२६ परवाना नूतनीकरणासाठी १५% वाढवलेली फी सुध्दा कमी करण्यात यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    सदर निवेदन देताना एरंडोल बियर बार असोसिएशन चे पदाधिकारी व सर्व परवानाधारक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या