- एरंडोल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
- एरंडोल:-येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हास्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, युवा सेना जिल्हा अध्यक्ष प्रा.मनोज पाटील, शालिग्राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, दशरथ महाजन, डॉक्टर फरहाज बोहरी,अरुण माळी, ईश्वर बिऱ्हाडे, श्रीमती उषा किरण खैरनार, शिवाजीराव अहिरराव, पी जी चौधरी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
यानंतर युवा कार्यकर्त्यांची शहरातून दिमाखदार मोटर सायकल रॅली काढण्यात आली. संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष लखन बनसोडे, उपाध्यक्ष पंकज चौधरी, नितीन बोरसे, कार्याध्यक्ष प्रवीण बाविस्कर, सचिव मोहन सैंदाणे, व अवि सोनवणे, कोषाध्यक्ष आकाश अहिरे, संघरत्न गायकवाड. माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड सुरेश सोनवणे प्राध्यापक भरत शिरसाट,औऔ प्राध्यापक , संदीप कोतकर डॉक्टर अतुल सोनवणे ईश्वर, बिराडे भैय्या अहिरे देवा निकम प्रकाश शिंदे ,मनोहर बोडरे रवी बोरसे ,आनंद सोनवणे, कैलास गायकवाड नरेंद्र गायकवाड संजय खैरनार रणजीत मोरे वाल्मीक सोनवणे प्रवीण केदार व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण प्रसंगी आमदार अमोल पाटील, माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पवार, प्रा. मनोज पाटील व इतर मान्यवर.