*एरंडोल येथे महसूल सप्ताह २०२५ निमित्त वृक्षारोपण……..!*

एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात ३ऑगस्ट २०२५ रोजी महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा व सार्वजनिक जागा जसे गायरान जमीन,स्मशान भूमी,शाळा ,गावठाण, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय परिसर याठिकाणी सर्व तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी एकूण ४३५ रोपांचे वृक्षारोपण शेतकरी बांधव,नागरिक,सेवाभावी संस्था व विद्यार्थी यांच्या माध्यमातून यशस्वीपणे केले.सदर वृक्षारोपणासाठी रोपे मानसिंग राजपूत सामाजिक वनीकरण अधिकारी एरंडोल यांनी उपलब्ध करून दिली.
विशेष म्हणजे यावेळी एरंडोलचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सह परिवार एरंडोल- टोळी शिवरस्त्यावर वृक्षारोपण केले. तसेच एरंडोल – पद्मालय रस्त्याच्या दुतर्फा नायब तहसीलदार संजय घुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी मंडळाधिकारी एरंडोल सुनीता चौधरी ,ग्राम महसूल अधिकारी उमरदे अमर भिंगारे ,ग्राम महसूल अधिकारी एरंडोल सागर कोळी आणि महसूल सेवक पंकज भोई आदी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले.