Home » सामाजिक » *एरंडोल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन……..!*

*एरंडोल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन……..!*

  1. *एरंडोल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन……..!*

    ​एरंडोल प्रतिनिधी  –  श्री साई गजानन मंदिर संस्थान, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल नवी मुंबई आणि नामदार गुलाबराव पाटील सोशल फाउंडेशन पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १७ सप्टेंबर २०२५, बुधवार रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत श्री साई गजानन मंदिर संस्थान, बस स्थानकाजवळ, एरंडोल येथे होणार आहे.
    ​शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांची पनवेल येथील आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. रुग्णांसाठी पनवेल येथे जाण्याची व येण्याची तसेच हॉस्पिटलमध्ये जेवण व निवासाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
    तसेच ​या शिबिरात सहभागी होण्यासाठी रुग्णांनी आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच, मधुमेहाच्या किंवा रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेत असल्यास त्या गोळ्या आणि डॉक्टरांची फाईल सोबत ठेवावी. शिबिराला येताना उपाशीपोटी यावे (चहा किंवा नाश्ता घेऊ नये). शस्त्रक्रियेसाठी निवड झाल्यास टिफिन आणि पांघरूण सोबत ठेवावे.
    ​डोळ्यांच्या गंभीर समस्या आणि शस्त्रक्रियेची गरज असलेल्या व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी बापू मोरे (९३२५४५६७३३), संदीप महाजन (९४२२७८१२८९), प्रा. जी. आर. महाजन (९४२०७९००७९) आणि मंगेश पाटील (७५८८००७८९३) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या