Home » सामाजिक » एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया – गंधमुक्ती व पित्रांना हेल्मेट वाटप नावीन्य उपक्रम वैराळे परिवाराचा !…

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया – गंधमुक्ती व पित्रांना हेल्मेट वाटप नावीन्य उपक्रम वैराळे परिवाराचा !…

  1. एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया – गंधमुक्ती व पित्रांना हेल्मेट वाटप नावीन्य उपक्रम वैराळे परिवाराचा !…

    भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !…

    एरंडोल प्रतिनिधी–  तालुक्यातील माळीवाडा शांतीनगर परिसरातील रहिवासी पुंडलिक व इच्छाराम झोपडू महाजन यांचे बंधू व हिरालाल व रवींद्र पितांबर महाजन यांचे वडील निसर्गवासी पितांबर झोपडू महाजन यांचे वृद्धापकाळाने दि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी निसर्गविलीन झाले त्यांची दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते शिवदास महाजन एरंडोल व भगवान रोकडे चाळीसगाव यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या स्मृतिप्रित्तर्थ कुटुंबातील सदस्यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले. व पित्रांना हेल्मेट वाटप करण्यात आले.

    सदर कार्यक्रमास सत्यशोधक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सर्व “साक्षी जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी ” हा सत्यशोधक समाजाचा मूलमंत्र आहे याप्रमाणे सर्वांनी विधी करावेत व शोषणापासून मुक्त व्हावे असे प्रतिपादन पाटील यांनी केले. यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी महात्मा फुले व सावित्रीमाईंचे विचार प्रेरणादायी आहेत या विचारांवर मार्ग क्रमांक करावे यानंतर पाटील यांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. विजयकर्ते शिवदास महाजन यांनी सार्वजनिक सत्य धर्माची प्रार्थना हे सामूहिक गायन केले. भगवान रोकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
    याप्रसंगी निवृत्त तहसीलदार अरुण माळी, समाजभूषण देविदास महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, रविंद्र महाजन, संजय महाजन, व सगे सोयरे,आप्तेष्ट व समाज बांधव उपस्थित होते.
    सदर कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने केल्याने सर्व शहरातील बंधूंनी कौतुक केले या पुढील सर्व विधी हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेले सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सत्यशोधक पद्धतीने करायला पाहिजे सर्व उपस्थित त्यांनी ठरवले वरील कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, जळगांव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांच्याकडून मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या