Home » सामाजिक » एरंडोल येथे सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात नथ्थु बापू समाधीवर चढविण्यात आली मानाची भगवी चादर

एरंडोल येथे सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात नथ्थु बापू समाधीवर चढविण्यात आली मानाची भगवी चादर

  1. एरंडोल येथे सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात नथ्थु बापू समाधीवर चढविण्यात आली मानाची भगवी चादर

    एरंडोल:-येथे पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे २ डिसेंबर २०२४ रोजी शहरातून वाजत गाजत जल्लोषात मिरवणूक काढून रात्री नऊ वाजेच्या सुमारास नथ्थु बापू समाधीवर मानाची भगवी चादर चढविण्यात आली. मिरवणुकीत व चादर चढविण्याच्या कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नथ्थु बापू समाधीवर मानाची भगवी चादर चढविण्याची परंपरा गेल्या बारा वर्षापासून कायम राखण्यात आली आहे.
    सोमवारी सायंकाळी पांडव वाड्या नजीकच्या हनुमान मंदिरात महाआरती रमेश महाजन, राजेंद्र चौधरी, प्रसाद दंडवते, वसंत पवार, कुणाल महाजन ,सतीश परदेशी, सिद्धार्थ परदेशी यांच्या हास्ते करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजी करीत मिरवणुकीला प्रारंभ झाला विठ्ठल मंदिर ,मारवाडी गल्ली भगवा चौक मेन रोड मार्गे मिरवणूक जाऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुधवार दरवाजा मार्गे नथ्थु बापू समाधी स्थळाजवळ मिरवणूक पोहोचली असता नथ्थुबापू यांच्या समाधीला मानाची भगवी चादर जल्लोषात चढविण्यात आली.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी उत्सव समिती अध्यक्ष वैभव पाटील, मुन्ना महाले उत्सव समिती उपाध्यक्ष, बंटी ठाकूर ,कल्पेश शिंपी, रोहन साळी,, वसंत पवार कुणाल महाजन, मयूर महाजन मयूर बिर्ला गणेश वाणी शेखर ठाकूर कुणाल पाटील भुरा पाटील दिनेश महाजन प्रकाश पाटील ऋषिकेश मोराणकर गणेश सोनार स्वप्नील वसाने रोहिदास महाजन किरण लोहार आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


    भगवी चादर चढवितांना माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहीरुद्दीन शेख कासम, व इतर मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या