- *एरंडोल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी…*
एरंडोल येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकात महात्मा फुले युवा क्रांती मंच व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. स्त्रियांच्या उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याला मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उजाळा दिला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला. फुले दांपत्याच्या जीवनावरील महत्त्वाच्या प्रसंग यावेळी महिलांनी रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, नगरसेवक अनिल महाजन, नगरसेवक मयूर महाजन, नगरसेवक रवींद्र महाजन, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, नगरसेविका कल्पना पाटील, नगरसेविका छाया दाभाडे, नगरसेविका कमलताई पाटील, नगरसेविका सुनीता माळी, नगरसेविका सत्यभामा पाटील, नगरसेविका आरती महाजन, नगरसेविका शारदा मराठे, नगरसेविका भारती पाटील, नगरसेविका जिजाबाई पाटील, शोभा साळी, नंदा शुक्ला, मीना मानुधने, शालिनी कोठावदे, गौरी मानुधने, यांच्यासह महात्मा फुले युवा क्रांती मंचचे सदस्य व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या…
