Home » सामाजिक » एरंडोल वकील संघाच्या नवीन कार्यकारणीची निवड जाहीर

एरंडोल वकील संघाच्या नवीन कार्यकारणीची निवड जाहीर

  1. एरंडोल वकील संघाच्या नवीन कार्यकारणीची निवड जाहीर
    ऍड.मनोहर महाजन
  2. ऍड. आकाश महाजन
  3. ऍड. प्रेमराज पाटील
    एरंडोल;-येथे १३ फेब्रुवारी २९२५ रोजी एरंडोल वकील संघाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात होऊन नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली ‌. अध्यक्षपदी ऍड .मनोहर मधुकर महाजन व सचिव पदी ऍड. आकाश निंबाजी महाजन तर सहसचिव म्हणून ऍड . प्रेमराज पाटील याप्रमाणे निवड करण्यात आली.
    अध्यक्षपदासाठी व सचिव पदासाठी निवडणूक घेण्यात आली तर सहसचिव यांची अगोदरच बिनविरोध निवड करण्यात आलेली होती. अध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक गुप्त मतदान होऊन घेण्यात आली. उत्साहात मतदान पार पडले. मतदान अधिकारी म्हणून ऍड .अशोक आबाजी पाटील, ऍड .विलास मोरे यांनी काम पाहिले, त्यांना ग्रंथपाल प्रदीप जाधव व टायपिस्ट विजय पवार यांनी सहकार्य केले. अध्यक्षपदी ऍड .मनोहर महाजन व सचिव पदी ऍड .आकाश महाजन हे निवडून आले. त्यांच्या निवडीबद्दल वकील संघाच्या सर्व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या