-
*एस टी बसमध्ये प्रवाशी होते शंभर पण अर्ध्या रस्त्यावरच झाली ती पंक्चर……!*
एरंडोल – सध्या लग्नसराईचा धुमधडाका सुरू असल्यामुळे एस टी व खासगी वाहनांमध्ये तोबा गर्दी दिसून येते.मंगळवारी ६ मे २०२५ रोजी जळगाव शिरपूर ही बस धरणगाव बसस्थानकातून सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास चोपड्याकडे मार्गस्थ झाली.लग्न सापडायला पाहिजे म्हणून लगीन घाई करत गाडीत पुरेशी जागा नसतांनाही प्रवाशांनी गर्दी केली.त्यामुळे प्रवासी संख्या जवळपास १०० पर्यंत पोहोचली.पण एस टी बस अर्ध्या रस्त्यावर पोहचली न तोच तापी नदीच्या पुलाजवळ गाडीचे चाक पंक्चर झाले.सर्व प्रवाशांनी बस खाली उतरून आपल्याला बस दुरूस्तीचे कोणतेही ज्ञान नसतांना पंक्चर झालेल्या चाकाचे दर्शन घेतले.सौजन्य शुन्य भावना व्यक्त करीत वाहकाने प्रवाशांना पुढच्या प्रवासाबद्दल काही एक आश्वासन दिले नाही.शेवटी ज्याला जे वाहन मिळाले त्या वाहनाने प्रवाशांनी लगीनघाई केली.
विशेष हे की जळगाव,धुळे जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारांमध्ये बहुतांश सेवानिवृत्त झालेल्या गाड्या प्रवासी वाहतूकीसाठी सर्रास वापरल्या जातात.त्याचाच अनुभव या पंक्चर झालेल्या गाडीत बसलेल्या प्रवाशांना आला.प्रवाशांची पुढच्या प्रवासाची सोय करून देण्याबाबत एस टी वाहकाने फारसा रस दाखवला नाही.कारण त्याने आधीच तिकीटाचे पैसे त्याच्या खिशात कोंबले होते.मात्र प्रवाशांचे दुर्दैव असे की पुढच्या प्रवासासाठी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.या गाडीत एरंडोल येथील एक जाणकार पत्रकार प्रवास करीत होते.त्यांनी जनहिताय जनसुखाय एस टी गाडीत पुन्हा बसणार काय? असा प्रश्न स्वतःला विचारीत एक हात डोक्याला व दुसरा हात खिशाला लागलेला पाहून वाहकाला सुध्दा हसू फुटले.