-
गणेश आरास स्पर्धा 2025- 26 करिता नम्रता गणेश मंडळ यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक…….
-
एरंडोल प्रतिनिधी –. येथे कै.बळवंत विष्णू विसपुते सार्वजनिक वाचनालय यांचे तर्फे आयोजित गणेश आरास स्पर्धा 2025- 26 करिता नम्रता गणेश मंडळ यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित गणेश आरास स्पर्धा मध्ये विविध निकषास पात्र ठरले म्हणून नम्रता गणेश मंडळ यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सालाबादाप्रमाणे एरंडोल शहरातील विविध गणेश मंडळ आपल्या नियोजनानुसार विविध कार्यक्रम राबवत असते गणपती मंडळामार्फत गणपती स्थापना,तसेच मिरवणूक यासोबत आकर्षक रोषणाई, विविध कार्यक्रम ,जिवंत देखावे व समाज प्रबोधन पर विविध नाटिका सादर करीत असतात ज्या माध्यमातून लोकांमध्ये समाजातील विविध प्रश्नांना उपस्थित करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम शहरातील गणेश मंडळ करत असतात. व त्यासाठी कै. बळवंत विष्णू विसपुते वाचनालय तर्फे आयोजित गणेश आरास स्पर्धेत नम्रता गणेश मंडळ सर्व निकषास पात्र ठरल्यामुळे त्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर नरेंद्र ठाकूर गटनेता मनोज पाटील ग्रामीण उन्नती संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते, श्री एस आर पाटील श्री सुनील भैय्या पाटील उपस्थित होते
