Home » महाराष्ट्र » गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला

गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला

  1. गिरणा नदीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा गिरणा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू ; आई-वडील ही नसल्याने आजी करत होती नातवाचा सांभाळ मात्र काळाने हिरावला

    प्रतिनिधी – कढोली ता एरंडोल  येथे कांताई धरणाच्या खालच्या बाजूला जवळच गिरणा नदीत कढोली हद्दीत सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान जळगाव येथील सिंधी कॉलनी परिसरातील चार तरुण कांताईधरणावर फिरण्यासाठी आले असता ते गिरणा नदीत उतरून हातपाय धुत असताना दोन तरुण पाय घसरून पडून बुडाले त्यापैकी त्या ठिकाणी उपस्थित मासे धरणारे व इतर स्थानिक तरुणांनी एकाला वाचवले तर आशुतोष दिलीप कुमार जोशी वय २२ याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला अशुतोष कुमार याला आई-वडील नसल्याने त्याचा सांभाळ त्याची आजी करत होती मात्र काळाने आशुतोषलाही हिरावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे आशुतोष पाय घसरून पडल्यानंतर बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याने आशुतोषच्या मित्राने त्याचे मामा गोविंद पुरुषोत्तम जोशी यांना फोन करून दुर्घटनेच्या ठिकाणी बोलावले अशितोषला स्थानिकांनी पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर प्राथमिक उपायोजना करण्यात आल्या मात्र त्याचा उपयोग झाला नाही त्यानंतर एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्या ठिकाणी मयत घोषित केले आशुतोषचे मामा गोविंद जोशी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला जबाब दिल्यानंतर घटनेची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी नरेंद्र सिंग पाटील हे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या