-
जेष्ठ नागरीक संस्थेचे सूर्योदय दिनदर्शिका चे प्रकाशन थाटात संपन्न
-
एरंडोल प्रतिनिधी – येथे सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेने त्यांच्या सलाबादाप्रमाणे दिनदर्शिकेचे प्रकाशन एरंडोल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व डॉ. सौ गीतांजली ठाकूर नगरसेविका यांचे शुभहस्ते संस्थेच्या सभागृहात दिनांक 30 /12/ 2025 रोजी करण्यात आले .संस्थेतर्फे त्यांचा सहपत्नीक सत्कार संस्थेचे अध्यक्ष निवृत्त तहसीलदार अरुण माळी साहेब, सचिव विनायक कुलकर्णी व सर्व संचालक मंडळातर्फे करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरुण माळी हे होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमास 125 सभासद बांधव हजर होते डॉक्टर नरेंद्र ठाकूर यांनी आपल्या मनोगतात मी या संस्थेशी पंधरा वर्षापासून संपर्कात आहे त्यामुळे मी आपल्या समस्या समजू शकतो व त्या भविष्यात तालुक्याचे आमदार मा. अमोल दादा पाटील यांचे मार्फत नक्कीच मार्गी लावेल .आपल्या ज्येष्ठांच्या आशीर्वादानेच आम्ही एकाच वेळी दोघे पती-पत्नी या पदापर्यंत लोकसेवेसाठीच पोहोचलो आहोत असे भावनिक आवाहन केले .त्याचवेळी Sunsure company मुंबई व जळगाव येथील आर एल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील तज्ञ डॉक्टरांनी जेष्ठांची बीपी व शुगर ची मोफत तपासणी केली .त्यात 121 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. संस्थेचे जेष्ठ सभासद श्री .योगराज बाबुराव देवरे यांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त उपस्थित सभासदांना स्नेह भोजन दिले . माहे डिसेंबर 2025 मधील २० जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस संस्थेतर्फे साजरे करण्यात आले.त्याच वेळी वाढदिवसानिमित्त जगन्नाथ तुकाराम महाजन यांनी संस्थेस 1011 रुपये देणगी दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप, जेष्ठ संचालक प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव सर, पी.जी. चौधरी सर ,वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील ,नामदेव पाटील, भगवान महाजन ,सुरेश देशमुख ,जगन महाजन, सुपडू शिंपी ,गणेश नामदेव पाटील निंबा बडगुजर भागवत पाटील, निंबा कुंभार ,सुभाष दर्शे, डॉ. अमृत के पाटील, पंडित महाजन, एन डी पाटील साहेब ,डी एस पाटील सर, नानाभाऊ मिस्त्री ,साहेबराव पाटील, वसंत देशमुख, वामनराव माळी,जगदीश साळी, अशोक वंजारी ,रमेश निंबा माळी, निवृत्त नायब तहसीलदार श्री.भीमसिंह जाधव व सुरेश पारखे,व अशोक झेंडू महाजन,भास्कर कोळी ,रामदास शेठ पिंगळे , जगन्नाथ तेली सर, गुलाबराव पवार यांचे सह सर्व सभासद बांधव उपस्थित होते आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली .
