Home » सामाजिक » ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने मराठा समाजभुषण पुरस्कार दिला, त्याला सार्थ ठरविण्यासाठीच कार्य करणार – आमदार अमोलदादा पाटील यांनी प्रतिपादन केले..

ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने मराठा समाजभुषण पुरस्कार दिला, त्याला सार्थ ठरविण्यासाठीच कार्य करणार – आमदार अमोलदादा पाटील यांनी प्रतिपादन केले..

  1. ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने मराठा समाजभुषण पुरस्कार दिला, त्याला सार्थ ठरविण्यासाठीच कार्य करणार – आमदार अमोलदादा पाटील यांनी प्रतिपादन केले..

     

    अमळनेर प्रतिनिधी – तालुका मराठा समाजाचा वतीने मराठा समाजभुषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा मा.मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई अध्यक्ष आ.नरेंद्रजी पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण,
    खासदार स्मिताताई वाघ यांच्या मुख्य अतिथी, मा.आमदार डॉ.बी.एस.पाटील, साहेबरावदादा पाटील, मा.नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, जेष्ठ पत्रकार पांडुरंगजी पाटील, मा.जि.प.सदस्या जयश्रीताई पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

    यासोहळ्यात अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे मराठा समाज भुषण पुरस्कार आमदार मा.अमोलदादा पाटील यांना देण्यात आला तर गृप ग्रामपंचायत ढेकु बु चे उपसरपंच नथ्थुआण्णा सोनवणे, मा.जि.प.सदस्य गिरिषबापु पाटील, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकजी कोते, अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रयजी निकम, अंधेरी(मुंबई) RTO मयुर यांचा विशेष सत्कार करण्यात व नंतर विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला.

    याप्रसंगी अमळनेर तालुका मराठा समाजाचे पदाधिकारी, सदस्य, विविध तालुका, जिल्हा व राज्यातुन आलेले मराठा समाजाचे मान्यवर यांचेसह मराठा समाज बांधव, माता-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    आज मला समाजभुषण व माझ्यासह विविध मान्यवरांनी अनेकानेक क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा सत्कार, आपले आशिर्वाद, आपले मार्गदर्शन, आपण केलेले कौतुक हेच सारचं आम्हाला कौतुकास्पद होण्यासाठी प्रेरणा, ऊर्जा प्राप्त करून देते. आज हा पुरस्कार मला ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने दिला त्याला सार्थ ठरविण्यासाठी कार्य तर सुरूच आहे, परंतु आता हे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी मला अधिकाधिक बळ मिळाले. अमळनेर तालुका मराठा समाजाचा मी या सभेचा अजेंडा वाचला, खरचं त्यांचे कार्य अगदी कौतुकास्पद आहे. हे पदाधिकारी, सदस्य आपला बहुमुल्य वेळातुन वेळ काढुन समाज प्रगतीपथावर नेण्यासाठी खुप प्रयत्न करतात. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. परंतु येत्या काळात या पवित्र कार्यात आम्हाला देखील सहकार्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, समाजासाठी शक्य तेवढा वेळ देवुन आम्ही देखील मदतीसाठी सज्ज असल्याचे यावेळी आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या