- अजीज खान प्रतिनिधी ढाणकी–
- जातीय सलोखा कायम राखण्याकरिता पोलीस स्टेशन बिटरगाव,नव दुर्गा उत्सव मंडळ, धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती, पत्रकार बांधव व समस्त ढाणकीवासियांच्या वतीने पोलीस चौकी ढाणकी येथे ६ ऑक्टोंबर रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात सर्वप्रथम बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांनी रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असा संदेश दिला त्यानंतर नवदुर्गा मंडळाचे सदस्य, पत्रकार बांधव, धम्मचक्र प्रवर्तन दिन समिती सदस्य,पोलीस कर्मचारी, राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून रक्तदान केले. अनिल येरावार, प्रशांत विनकरे, रुपेश भंडारी यांनी आपले विचार व्यक्त करताना रक्तदानाचे महत्त्व सांगितले .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ठाणेदार संतोष मनवर यांनी रक्तदान संकल्पने विषयी आपले विचार व्यक्त करताना रक्तदान शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे परंतु संकलित केलेले रक्त हे वेळेवर गंभीर, गरजू, गरीब रुग्णाला मिळाले पाहिजे अन्यथा रक्तदान शिबिराचे महत्त्व राहणार नाही असे विचार व्यक्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले रक्तदान शिबिरातून संकलित केलेले सर्व रक्त डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय नांदेड येथील रक्तपेढीला तसेच जिजाऊ रक्तपेढीला देण्यात आले यावेळी रक्तसंकलित करण्यासाठी आलेल्या सर्व टीमचे तसेच रक्तदान केलेल्या सर्व दात्यांचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश महाजन तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टीपूर्णे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी पोहेका रवी गिते, रोशन सरनाईक, पो.ना. गजानन खरात, देविदास हाके, दत्ता कुसराम, हिंमत जाधव, निलेश भालेराव यांनी परिश्रम घेतले.