- एरंडोल – येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र महाजन यांचे आजोबा स्व.गोटू शिवराम महाजन यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळेसाठी एरंडोल शहराच्या मोक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी असलेली एक एकर जागा दान केली होती.संस्थेतर्फे स्व.गोटू महाजन यांचा स्मृतीदिवस ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रा.ति.काबरे विद्यालयात साजरा करण्यात आला.
- संस्थांध्यक्ष शरद काबरा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी स्व.गोटू महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन शरद काबरा व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत महाजन यांच्या हस्ते होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्रीकांत काबरा यांनी केले.आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका कल्पना झंवर यांनी केले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कैलास महाजन व कुलदीप महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संजय काबरा,राजू मणियार, नारायण काबरे,पी.एच.नारखेडे,पी.एच.नेटके, दत्तात्रय महाजन, लक्ष्मण महाजन, दिलीप महाजन,चेतन महाजन, रमेश महाजन, श्रीकांत महाजन, अजय महाजन, अविनाश महाजन,शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.