-
*दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रूपये अनुदान मिळण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नायब तहसीलदारांची भेट……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रदीप पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अमोल बंग यांची भेट घेऊन दिव्यांग लाभार्थ्यांना इतर तालुक्याप्रमाणे दरमहा २ हजार ५०० रूपये मानधन देण्यात यावे.या मागणी संदर्भात चर्चा केली.यावेळी महसूल यंत्रणेकडून पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश चौधरी, तालुका सचिव प्रदीप फराटे,सोनू वाणी,गोपाळ शिरवाणी, रूपाली चौधरी,निर्मल चौधरी, सहाय्यक अय्याज शेख, विजय कोळी हे उपस्थित होते.
दिव्यांग लाभार्थ्यांनी आधार कार्ड,यु डी आय कार्ड, प्रमाणपत्र,बॅंक पासबुक यांच्या छायांकीत प्रती नातेवाईकांमार्फत तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागाकडे सादर करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
