Home » सामाजिक » *निपाणे तालुका एरंडोल येथील शेतकऱ्याच्या सुपुत्राने मिळवला राज्यसेवेचा मानाचा तुरा!*

*निपाणे तालुका एरंडोल येथील शेतकऱ्याच्या सुपुत्राने मिळवला राज्यसेवेचा मानाचा तुरा!*

  1. *निपाणे तालुका एरंडोल येथील शेतकऱ्याच्या सुपुत्राने मिळवला राज्यसेवेचा मानाचा तुरा!*

     

    एरंडोल प्रतिनिधी – निपाणे (ता. एरंडोल) येथील सुपुत्र चि. हर्षल राजेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्यसेवा परीक्षा 2024 उत्तीर्ण करून संपूर्ण निपाणे व एरंडोल तालुक्याचे नाव अभिमानाने उजळवले आहे
    हर्षल यांची महाराष्ट्र राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतून Class–1 अधिकारी म्हणून निवड झाली असून,
    या परीक्षेत महाराष्ट्रभरातून एकूण 477 उमेदवार उत्तीर्ण झाले, त्यापैकी हर्षल पाटील यांनी राज्यात 111वा क्रमांक मिळवला आहे!
    हर्षल राजेंद्र पाटील हे
    स्व. उत्तमराव तानकु पाटील (उत्तमराव गुरुजी) यांचे नातू,
    राजेंद्र उत्तमराव पाटील यांचे जेष्ठ सुपुत्र,
    दिनेश उत्तमराव पाटील यांचे पुतणे
    आणि युवा सेना तालुका प्रमुख कमलेश पाटील यांचे मोठे बंधू आहेत.

    शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या हर्षल यांनी मर्यादित साधनसंपत्ती असूनही परिश्रम, नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
    त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

    आज हर्षल यांच्या या उल्लेखनीय यशामुळे निपाणे गावासह एरंडोल तालुक्याच्या शिरापेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे!
    गावाचा प्रत्येक नागरिक या यशाबद्दल अभिमान बाळगतो आहे.
    हर्षल राजेंद्र पाटील यांच्यावर अभिनंदाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या