pune potholes : पुण्यात ट्रक एका मोठ्या खड्ड्यात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे पुण्यातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. असे असताना पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज असल्याचं पुढं आलं आहे. राष्ट्रपती या पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने पुणे महानगर पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली मात्र, ती चुकीच्या पद्धतीने केली. त्यामुळे या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, २६ तारखेला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असून त्या पूर्वी रस्ते दुरुस्त करावे असे पत्र पुणे पोलिसांनी पालिकेला लिहिले आहे.